Manish Jadhav
हेडिंग्ले येथे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी ऋषभ पंतचा जलवा पाहायला मिळाला.
पंतने कसोटीच्या दोन्ही डावात शानदार फलंदाजी करुन शतक झळकावले. पंत भारतासाठी एकाच कसोटीत दोन शतके झळकावणारा पहिला यष्टिरक्षक फलंदाज ठरला.
आता दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून एजबॅस्टन येथे खेळला जाणार आहे. या सामन्यातही त्याच्याकडून भारतीय संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
दुसऱ्या कसोटीत किंग कोहलीचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी ऋषभ पंतकडे असणार आहे.
पंतने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध एकूण 5 शतके झळकावली आहेत, त्यापैकी चार शतके इंग्लंडच्या भूमीवर लगावली आहेत.
विराट आणि पंत इंग्लंडविरुद्ध शतकी कामगिरी करण्यात यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
आता जर पंत एजबॅस्टनमध्ये शतक झळकावण्यात यशस्वी झाला तर तो विराट कोहलीला मागे सोडेल. पंतचा सध्याचा फॉर्म पाहता, हे अजिबात कठीण वाटत नाही.