Manish Jadhav
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यापैकीच एक विजयदुर्ग होता.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात 'विजयदुर्ग किल्ला' आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा त्याचे नाव 'विजयदुर्ग' असे ठेवले.
मराठा साम्राज्याच्या इतिहासात या किल्ल्याला खूप महत्त्व होते.
दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक विजयदुर्ग किल्ल्याला भेट देतात.
किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकन मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे 225 किलोमीटरवर आणि गोव्याच्या उत्तरेस 150 किलोमीटरवर आहे. सुमारे 17 एकर जागेत हा किल्ला पसरला आहे.