Manish Jadhav
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) दाखवलेला पराक्रम क्रिकेट चाहत्यांसाठी अविश्वसनीय ठरला.
शार्दुल ठाकूर बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत असताना पंतने अतुलनीय जिद्द दाखवत पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात येत आपला क्लास दाखवून दिला.
चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात पंतने 54 धावांची महत्त्वाची खेळी खेळली, ज्यात तीन चौकार आणि दोन षटकार मारले.
या शानदार खेळीच्या जोरावर ऋषभ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनला.
त्याने रोहित शर्माचा (2716 धावा) विक्रम मोडत 2731 धावा केल्या.
बोटाला फ्रॅक्चर असतानाही ऋषभ WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला.
पंतने 2018 मध्ये कसोटी पदार्पण केले असून तो आता संघाचा अविभाज्य भाग आहे.
त्याने आतापर्यंत 47 कसोटी सामन्यांमध्ये 8 शतकांसह एकूण 3427 धावा केल्या आहेत. या इंग्लंड दौऱ्यावरही त्याने पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शतके, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत अर्धशतके झळकावली आहेत.