Sameer Amunekar
रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर हळद टाकल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी-खोकला दूर राहतो.
सकाळी दुधात बदाम पावडर टाकून प्यायल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते व स्मरणशक्ती सुधारते.
उकळत्या दुधात खजूर टाकून प्यायल्यास शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि रक्ताची कमतरता भरून निघते.
दुधात भिजवून घेतलेले अंजीर पचन सुधारतात आणि हाडे मजबूत करतात.
केशर टाकून गरम दूध प्यायल्यास त्वचा उजळते, ताणतणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते.
हिवाळ्यात दुधात सुंठ पावडर टाकून प्यायल्यास सर्दीपासून संरक्षण मिळते आणि शरीर उष्ण राहते.
साखरेऐवजी दुधात गूळ टाकून प्यायल्यास पचन सुधारते आणि शरीराला आवश्यक खनिजे मिळतात.