Akshata Chhatre
लिंबू हे एक लहानसं पण गुणकारी फळ आहे, जे आपल्याला स्वयंपाकघरात हमखास आढळतं.
उपयोग केवळ सरबत किंवा चव वाढवण्यासाठी नाही, तर पचन सुधारण्यासाठी, तहान शमवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठीही केला जातो
मात्र, लिंबू कापण्याच्या पद्धतीबाबत अनेक वेळा गोंधळ असतो. अनेकजण लिंबू उभा कापतात, पण स्वयंपाकघरातील जाणकार व्यक्ती मात्र नेहमी त्याला आडवे कापण्याचा सल्ला देतात.
यामागे खरंतर एक वैज्ञानिक कारण आहे. लिंबाच्या आतील रचना ही संत्रा किंवा मोसंबीप्रमाणेच छोट्या छोट्या पाकळ्यांपासून बनलेली असते.
प्रत्येक पाकळीत रस साठलेला असतो. जर आपण लिंबू उभा कापला, तर सुरी या पाकळ्यांना नीट छेदून जात नाही आणि त्यामुळे रस सहजपणे बाहेर येत नाही.
लिंबू जर आपण आडवा कापला, तर सुरी सरळ प्रत्येक पाकळीला छेदून जाते आणि पिळल्यावर लिंबाचा रस अगदी सहज आणि भरपूर प्रमाणात बाहेर पडतो.
लिंबाचा पूर्ण उपयोग करायचा असेल, तर त्याला नेहमी आडवे कापावे.