Akshata Chhatre
भारतातील बहुतांश घरांमध्ये चहा हा सकाळचा अविभाज्य भाग असतो. चहा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवला जातो काहींना आल्याचा चहा आवडतो, तर काहींना वेलचीचा सुगंध हवासा वाटतो.
मात्र, सुगंधी मसाले योग्य वेळेवर न घातल्यास चहाची चव बिघडू शकते.
बरेच जण चहा बनवताना आले, वेलची आणि इतर मसाले लवकरच पाण्यात घालतात, पण यामुळे त्यांचा सुगंध कमी होतो किंवा ते कडवटही होऊ शकतात.
योग्य पद्धत म्हणजे, सर्वप्रथम पाणी गरम करून त्यात किसलेले आले टाकावे, कारण आले चांगले मुरण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतर चहा पत्ती घालून ती उकळू द्यावी.
जेव्हा चहा पत्ती उकळून त्याचा रंग चांगला येतो, तेव्हाच दूध घालावे.
बरेचदा लोक चहा बनवताना आधीच दूध टाकतात, पण त्यामुळे पत्तीचा अर्क नीट निघत नाही आणि चव फिकी राहते. दूध घातल्यावरच साखर, वेलची किंवा इतर मसाले घालावेत.