Manish Jadhav
यंदा भारतात अब्जाधीशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 च्या रिपोर्टनुसार, 2024 मध्ये 94 नवीन अब्जाधीश भारतीय अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत.
रिपोर्टनुसार, भारतातील अब्जाधीशांनी सुमारे $1 ट्रिलियनची एकूण संपत्ती जमा केली आहे, जी एकूण जागतिक संपत्तीच्या 7 टक्के आहे. सर्वात श्रीमंत शहरे म्हणजे, ज्या शहरांमध्ये सर्वाधिक अब्जाधीश राहतात.
भारताची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईने चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकले आहे. बीजिंगला मागे टाकत मुंबई आता आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनले आहे.
रिपोर्टनुसार, मुंबई आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत राजधानी बनले आहे. म्हणजे भारतातील बहुतांश अब्जाधीश मुंबईत राहतात.
यंदा मुंबईत राहणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत 58 नवीन नावे समाविष्ट झाली आहेत. आता मुंबईत राहणाऱ्या अब्जाधीशांची संख्या 386 वर पोहोचली आहे.
देशाची राजधानी दिल्लीत यावर्षी 18 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे. आता दिल्लीत राहणाऱ्या अब्जाधीशांची संख्या 217 वर पोहोचली आहे.
या यादीत तिसऱ्या स्थानावर 104 अब्जाधीशांसह हैदराबाद आहे, जिथे 17 नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे.