Sameer Amunekar
अर्धा कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात दोन कप पाणी घालून ३० मिनिटे भिजत ठेवा. पाणी पांढरट झाल्यावर ते गाळून एका बाटलीत भरून ठेवा. हे पाणी तुम्ही फ्रिजमध्ये ४-५ दिवस साठवू शकता.
दररोज सकाळी चेहरा धुल्यानंतर कापसाच्या बोळ्याने तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेवरील साचलेली घाण निघून जाते आणि छिद्रे स्वच्छ होतात.
तांदळाचे पाणी एका स्प्रे बाटलीत भरा. दिवसातून दोनदा हे पाणी चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो आणि चेहरा फ्रेश दिसतो
तांदळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे पाणी चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा घट्टपणा (Elasticity) वाढतो, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल किंवा चेहऱ्यावर काळे डाग असतील, तर तांदळाचे पाणी लावल्याने त्वचेचा रंग उजळतो आणि जळजळ कमी होते.
अधिक चांगल्या रिझल्टसाठी तांदळाच्या पाण्यात थोडे मध किंवा कोरफड जेल (Aloe Vera Gel) मिसळून चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा.
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून तांदळाचे पाणी लावा आणि तसेच राहू द्या. रात्रभर हे पाणी त्वचेवर जादू करेल आणि सकाळी तुम्हाला चेहरा अधिक मऊ आणि चमकदार वाटेल.