Sameer Amunekar
तांदळाचे पीठ किंचित जाडसर असल्याने ते त्वचेवरील मृत पेशी (Dead Cells) काढून टाकण्याचे काम करते. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि नैसर्गिक चमक येते.
उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल, तर तांदळाच्या पिठात थोडे लिंबू आणि मध मिसळून लावा. हातापायांचे आणि चेहऱ्याचे टॅनिंग घालवण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे.
एका बाऊलमध्ये २ चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात १ चमचा कच्चे दूध आणि चिमूटभर हळद मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावून १५-२० मिनिटे तसेच राहू द्या.
तांदळाचे पीठ त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते. ज्यांची त्वचा तेलकट (Oily Skin) आहे, त्यांच्यासाठी हा फेसपॅक वरदान ठरतो. यामुळे पिंपल्सची समस्याही कमी होते.
तांदळाच्या पिठामध्ये अमिनो ॲसिड आणि विटामिन्स भरपूर असतात. याच्या नियमित वापरामुळे चेहऱ्यावरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे चेहरा तरुण दिसतो.
मिश्रण वाळल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने हलक्या हाताने चोळून धुवा. केवळ १५ मिनिटांच्या या घरगुती 'फेशियल'नंतर तुमचा चेहरा उजळ आणि तेजस्वी दिसेल.
हा उपाय करण्यापूर्वी एकदा 'पॅच टेस्ट' नक्की करा. जर तुमची त्वचा अतिशय कोरडी असेल, तर तांदळाच्या पिठात दुधाऐवजी थोडे दही किंवा मध वापरणे अधिक फायदेशीर ठरेल.