Akshata Chhatre
अरबी महिला कोणत्याही इव्हेंटपूर्वी घरी बनवलेले नैसर्गिक ब्लीच वापरतात, ज्यामुळे त्यांचा चेहरा वेगळाच उठून दिसतो.
हे ब्लीच बनवण्यासाठी तुम्हाला फक्त ३ गोष्टी हव्या आहेत: १. दही, २. तांदळाचे पीठ आणि ३. मिल्क पावडर.
एका वाटीत दही घेऊन त्यात तांदळाचे पीठ आणि मिल्क पावडर मिसळा. एक घट्ट पेस्ट तयार करा जी चेहऱ्यावर नीट बसेल.
हा पॅक चेहऱ्यावर लावून १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत साध्या पाण्याने चेहरा धुवा.
दह्यामुळे त्वचा हायड्रेट होते, तांदळाचे पीठ एक्सफोलिएशन करते आणि मिल्क पावडर त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करते.
चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. त्यामुळे कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी हातावर 'पॅच टेस्ट' नक्की करून पहा.
हा घरगुती उपाय नियमित वापरल्यास तुम्हाला कोणत्याही महागड्या पार्लर ट्रीटमेंटची गरज भासणार नाही!