गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील हा पारंपरिक उत्सव म्हणजे निसर्गासोबतची संस्कृती, विश्वास आणि जगण्याच्या लयीचे एक उत्तम उदाहरण आहे. कोणता आहे हा उत्सव?
कोंसाचेम फेस्त याला वार्षिक कापणीचा उत्सव असेही म्हणले जाते. याला कणसाचे फेस्त असेही काही लोक म्हणतात. जाणून घेऊ काय आहे हा फेस्त.
हा उत्सव निसर्गाने भरभरून दिलेल्या दानाबद्दल कृतज्ञता म्हणून साजरा करतात. याचे प्रतिक म्हणून प्रतिकात्मकरित्या भाताचे पीक कापतात.
गावातले लोक एकत्र येऊन उभ्या पीक बद्दल कृतज्ञता व्यक्त करून भाताचे पीक कापतात आणि प्रथेनुसार त्याचे वाटप करतात.
या निमित्याने पारंपरिक पदार्थ बनवून मेजवानीची तयारी होते. यात गोड पदार्थांचा आणि स्थानिक पेयांचा समावेश असतो.
फुगडी, झालो असे खास गोवन नृत्यप्रकार सादर होतात. संगीताच्या तालावर उत्सव आनंदात साजरा होतो.
राय येथील अवर लेडी ऑफ स्नोज या चर्चचे फेस्त गोव्यात प्रसिद्ध आहे. इथे सेंट जॉन द बॅप्टिस्टची सुंदर मिरवणूक पाहता येते.
या फेस्तची परंपरा ४०० वर्षांहूनही जुनी आहे असे सांगितले जाते. सगळा समुदाय एकत्र येऊन निसर्गाशी नाळ जोडलेला हा उत्सव साजरा करतो.
गोव्याच्या समृद्ध संस्कृतीची कुजबुज 'केपे बाजारपेठ'