Akshata Chhatre
थंडीत किंवा पार्ट्यांच्या धावपळीत केस रूक्ष होतात. सिरम किंवा कंडिशनर्सपेक्षा घरगुती आयुर्वेदिक मास्क अधिक प्रभावी ठरतो.
हा हेअर स्पा मास्क बनवण्यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टी हव्यात: पांढरा तांदूळ, पिकलेले केळे आणि खोबरेल तेल.
तांदूळ पाण्यात इतका शिजवा की तो अगदी मऊ होईल. आता त्यात पिकलेले केळे आणि थोडे खोबरेल तेल मिसळा.
हे सर्व मिश्रण मिक्सीमध्ये वाटून घ्या. तुमची स्मूथ आणि नॅचरल 'हेअर स्पा क्रीम' तयार होईल, जी केसांवर लावण्यास सोपी आहे.
हा मास्क केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत नीट लावा. ४० मिनिटे ते १ तास केसांवर राहू द्या.
४० मिनिटांनंतर साध्या पाण्याने किंवा सौम्य शॅम्पूने केस धुवा. पहिल्याच वापरात तुमचे केस सिल्क-स्मूथ आणि चमकदार दिसतील.
तांदूळ केसांना ताकद देतो, केळे केसांना मऊ करते आणि खोबरेल तेल खोलवर पोषण देते. यामुळे केसांचे नुकसानही होत नाही.