Sameer Panditrao
युद्धकाळ नसताना महाराज मावळ्यांना विविध जबाबदाऱ्या सोपवत असत, त्यातील महत्वाच्या गोष्टींची आपण माहिती घेऊ.
गडांची देखभाल गडकरी करायचेच पण विशेष कामगिरी महाराज आपल्या मावळ्यांवर सोपवत असत.
रस्ते ही महत्वाची गोष्ट असल्याने महाराज खात्रीतील मावळ्यांना या रस्तेबांधणी आणि दुरुस्तीवर लक्ष ठेवण्याची कामगिरी देत.
शेती, शेतकऱ्यांना अजिबात त्रास होऊ नये यासाठी मावळ्यांना खास सूचना देत.
महाराजांचे हेरखाते प्रचंड कुशल होते. स्वराज्याचे मावळे प्राण धोक्यात घालून यासाठी काम करत.
सह्याद्रीत लढताना चपळ वेगवान घोडदळ आवश्यक असायचे. यासाठी विशेष तुकडी नियुक्त असायची.
स्वराज्याला अनेक शत्रू होते. गस्ती, पहारे पथक शिस्तबद्ध ठेवण्यासाठी महाराजांनी निवडक मावळे हेरले होते.