Sameer Amunekar
दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे.
विशेष आकर्षण
प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील परेड हे विशेष आकर्षण असतं. या परेडची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. देशभरातली आणि परदेशातील भारतीयही हा दिवस साजरा करण्यासाठी उत्सुक आहेत.
लोककलांचे प्रदर्शन
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आपापल्या सांस्कृतिक विविधतेचे, रंगीबेरंगी वेशभूषा, नृत्ये आणि लोककलांचे प्रदर्शन या परेडमध्ये करतात.
भारतीय लष्कराची ताकद
परेडमध्ये भारतीय लष्कराची ताकद आणि विविध प्रकारच्या नवीन तंत्रज्ञानाचा देखील समावेश असतो. यामध्ये शस्त्रास्त्रे, टँक, मिसाइल सिस्टीम आणि इतर यंत्रणा दर्शविली जातात.
पॅराट्रूपर्स आणि हेलिकॉप्टर्स
वायूसेनेचे पॅराट्रूपर्स आणि हेलिकॉप्टर्स देखील या परेडमध्ये सहभागी होतात.
सादरीकरणं
यावेळी नौदलाची आणि वायूसेनेची विविध प्रकारची शौर्य प्रर्दशनं देखील केली जातात. यामध्ये युद्धनौकांची सादरीकरणे असतात.
तोफांची सलामी
प्रजासत्ताक दिनात जेव्हा राष्ट्रगीत गायले जाते तेव्हा २१ तोफांची सलामी दिली जाते. विशेष म्हणजे या सगळ्या तोफांची सलामी राष्ट्रगीताच्या ५२ सेकंदाच्या आतच दिली जाते.