Sameer Panditrao
गोव्याच्या शांत गल्ल्यांमधून बाईकवर सफर करा. नारळाच्या झाडांनी भरलेल्या रस्त्यांवरून जाताना निसर्गरम्य भागांचा आनंद घ्या.
गोव्याच्या स्थानिक संस्कृतीशी जोडलेले राहण्यासाठी व्हिला किंवा होमस्टेमध्ये मुक्काम ठेवा. येथील घरगुती पाहुणचार तुम्हाला खास अनुभव देईल.
गर्दीच्या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहा. स्वत: शोध घेऊन शांत आणि स्वच्छ किनाऱ्यांना भेट द्या. कचरा टाकू नका आणि निसर्ग जपण्यास मदत करा.
सलीम अली पक्षी अभयारण्याजवळ बॅकवॉटर क्रूझिंग करून निसर्गसौंदर्याचा आनंद घ्या. स्थलांतरित पक्षी आणि मगरी पाहण्याचा रोमांचक अनुभव मिळवा.
नेत्रावली आणि मयनापी येथील रोमांचक ट्रेकिंग ट्राय करा. माहिती घेतलात तर इथे ट्रेकिंग साठी बरेच ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
इंटरनेटमुळे प्रसिद्ध झालेले किल्ले, चर्च पाहण्यापेक्षा आसपासच्या छोट्या गावांत फार, वेगवेगळी ठिकाणे पाहा.
मोठ्या हॉटेल्सऐवजी स्थानिक हॉटेल्समध्ये खाण्याचा आनंद घ्या आणि अनुभवा अस्सल चव.