Akshata Chhatre
दररोज दोन वेळा ब्रश करताना आपण एकच अपेक्षा ठेवतो आपल्या हसण्यातून पांढरेशुभ्र, निरोगी दात दिसावेत. पण अनेकदा तसंच होतं का?
काहींचे दात पिवळसरच राहतात. काही जणांच्या दोन दातांमध्ये काळसर थर दिसतो. अशावेळी अनेक जण डेंटिस्टकडे धाव घेतात, महागड्या ट्रीटमेंट्स करतात.
पण एक साधा, नैसर्गिक, स्वस्त आणि घरगुती उपाय आहे, जो खरोखर परिणामकारक ठरतो – लवंग आणि तुरटीचं औषधी पाणी.
प्राचीन काळापासून दातदुखीवर वापरली जाते. तिच्यातील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुण दातांवरील बॅक्टेरिया नष्ट करतात, दुर्गंधी कमी करतात आणि पिवळसर थर काढून टाकतात.yellow teeth removal| teeth stain home remedy
तुरटी
नैसर्गिक ब्लीचिंग एजंट. ती दातांवरील काळसर थर हलका करते, हिरड्यांमधील सूज कमी करते, बॅक्टेरियांचा नाश करते.
५–२० लवंगा अर्धा लिटर पाण्यात उकळा. पाणी थंड झाल्यावर त्यात १ चमचा तुरटी घाला. हे मिश्रण २–३ दिवस झाकून ठेवा – त्यामुळे औषधी गुण अधिक खोलवर उतरतात.