Akshata Chhatre
चेहऱ्यावरचे अवांछित केस सौंदर्यात अडथळा निर्माण करतात, पण आता काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी घरच्या घरी हे केस काढू शकता.
2 चमचे मध + 2 चमचे लिंबाचा रस चेहऱ्यावर लावा, सुकल्यावर टॉवेलने विरुद्ध दिशेने काढा, यामुळे त्वचा स्वच्छ होईल.
1 चमचा साखर + 1 चमचा हळद + थोडं पाणी हलक्याच हाताने स्क्रब करा, या स्क्रबमुळे केस कमी होण्यास मदत होते.
1 चमचा दालचिनी पावडर + 1 चमचा लिंबाचा रस 10-15 मिनिटं लावून ठेवा. हा मिश्रण नैसर्गिकरित्या केसांची वाढ कमी करतं.
बेसन + तांदळाचं पीठ + हळद + गुलाबपाणी 15 मिनिटं चेहऱ्यावर ठेवा, याने त्वचा उजळते आणि केसही कमी होतात
चेहऱ्यावर कोणतीही पेस्ट लावण्याआधी हातावर किंवा पायावर वापरून बघा. तुम्हाला कुठल्या घटकाची ऍलर्जी आहे का ते तपासा आणि सर्व ठीक असल्यासच चेहऱ्यावर लावा