केवळ 10 मिनिटांत टॅनिंग गायब! उन्हाळ्यात निस्तेज झालेल्या त्वचेसाठी 'या' फळाचा फेसपॅक नक्की वापरून पाहा

Sameer Amunekar

टॅनिंगवर रामबाण उपाय

उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्वचा काळवंडणे आणि निस्तेज होणे सामान्य आहे. पपईमध्ये असलेल्या नैसर्गिक घटकांमुळे चेहऱ्यावरील टॅनिंग अवघ्या काही मिनिटांत दूर होण्यास मदत होते.

Summer Fruit Face Pack | Dainik Gomantak

पपईमधील मुख्य घटक

'पपेन' एन्झाईमचा चमत्कार पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाईम असते, जे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्याचे काम करते आणि त्वचेचा नैसर्गिक रंग परत आणते.

Summer Fruit Face Pack | Dainik Gomantak

असा तयार करा फेसपॅक

पपई आणि मधाचा कॉम्बो २ चमचे पिकलेल्या पपईचा गर (Pulp) घ्या आणि त्यात १ चमचा शुद्ध मध मिसळा. हे मिश्रण एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. मध त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतो.

Summer Fruit Face Pack | Dainik Gomantak

लिंबाचा रस आणि पपई फेसपॅक

लिंबाच्या रसाचा वापर जर हाता-पायांवर किंवा चेहऱ्यावर जास्त टॅनिंग असेल, तर पपईच्या गरात ४-५ थेंब लिंबाचा रस घाला. लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि ब्लीचिंग गुणधर्म टॅनिंग वेगाने फिकट करतात.

Summer Fruit Face Pack | Dainik Gomantak

फेसपॅक लावण्याची योग्य पद्धत

चेहऱ्यावर कसा लावावा? हा फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर हा पॅक चेहरा आणि गळ्यावर व्यवस्थित लावा आणि बोटांनी २ मिनिटे हलका मसाज करा.

Summer Fruit Face Pack | Dainik Gomantak

फक्त १० ते १५ मिनिटे ठेवा

कधी धुवावा? हा फेसपॅक चेहऱ्यावर साधारणपणे १० ते १५ मिनिटे सुकू द्या. पॅक पूर्ण सुकल्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून मऊ कपड्याने पुसा.

Summer Fruit Face Pack | Dainik Gomantak

नैसर्गिक ग्लो

चमकदार आणि गोरीपान त्वचा पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला चेहऱ्यावर फरक जाणवेल. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास टॅनिंग पूर्णपणे गायब होऊन त्वचा काचेसारखी चमकेल आणि मऊ होईल.

Summer Fruit Face Pack | Dainik Gomantak

चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा ग्लो! 10 रुपयांच्या नाईट सीरमची जादू

Natural Glowing Skin | Dainik Gomantak
येथे क्लिक करा