Sameer Amunekar
दिवसभराच्या थकव्यामुळे त्वचा निस्तेज दिसते. रात्री झोपण्यापूर्वी नाईट सीरम लावल्याने त्वचेच्या पेशींचे पुनरुज्जीवन वेगाने होते आणि नैसर्गिक चमक येते.
हे सीरम बनवण्यासाठी तुम्हाला फक्त कोरफड जेल (Aloe Vera Gel), गुलाब पाणी आणि व्हिटॅमिन ई (Vitamin E) कॅप्सूलची गरज आहे. हे तिन्ही घटक अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होतात.
एका लहान बाऊलमध्ये २ चमचे कोरफड जेल घ्या. त्यात १ चमचा गुलाब पाणी आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल मिसळा. हे मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटा.
कोरफड जेलमध्ये दाहशामक गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. तर व्हिटॅमिन ई डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरील काळे डाग पुसून टाकते.
रात्री झोपण्यापूर्वी चेहरा सौम्य फेस वॉशने स्वच्छ धुवा. त्यानंतर सीरमचे काही थेंब हातावर घेऊन चेहऱ्यावर वर्तुळाकार (Circular Motion) मसाज करा.
हे नैसर्गिक सीरम तेलकट, कोरड्या आणि मिश्र अशा सर्व प्रकारच्या त्वचेसाठी सुरक्षित आहे. यामुळे त्वचा तेलकट न होता हायड्रेटेड राहते.
केवळ आठवडाभर या नाईट सीरमचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावर पार्लरसारखा ग्लो येईल. महागड्या ट्रीटमेंटची गरज न पडता तुमची त्वचा तजेलदार दिसेल.