Sameer Amunekar
एका कपात पांढरा व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. ही पेस्ट डागावर लावा आणि १५ मिनिटे ठेवा. नंतर पाण्याने धुवा. जुने तेल किंवा सॉसचे डागही गायब होतात.
लिंबाचा रस डागावर पिळा आणि त्यावर थोडे मीठ शिंपडा. कपडा उन्हात ३० मिनिटांसाठी ठेवा. हा उपाय पांढऱ्या कपड्यांवरील हळदीचे किंवा घामाचे डाग काढण्यासाठी उत्कृष्ट आहे.
नॉन-जेळ टूथपेस्ट थोडी डागावर चोळा आणि काही वेळानंतर धुवा. शाई किंवा लिपस्टिकचे डाग काढण्यासाठी हा उपाय उत्तम आहे.
एक चमचा बेकिंग सोडा आणि काही थेंब लिक्विड साबण एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डागावर लावून मऊ ब्रशने चोळा. काही वेळानंतर स्वच्छ धुवा.
रात्री कपडा थोड्या गरम दुधात भिजवून ठेवा. सकाळी हलक्या हाताने धुवा. रक्ताचे किंवा चॉकलेटचे डाग पूर्णपणे निघून जातात.
थोडेसे हायड्रोजन पेरॉक्साइड डागावर लावा, काही मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. हे कपड्यांना नुकसान न करता डाग काढते.
कधीही डाग लागल्यावर पहिल्यांदा थंड पाण्याने कपडा धुवा. गरम पाण्यामुळे डाग सेट होतो, त्यामुळे स्वच्छ होणे अवघड होते.