Akshata Chhatre
महिलांच्या चेहऱ्यावर नको असलेले केस असणे ही एक सौंदर्यविषयक सामान्य समस्या असली, तरी ती त्रासदायक ठरू शकते.
अनेक महिला यासाठी वॅक्सिंग, रेझर किंवा ब्लीचिंगसारखे उपाय करतात. मात्र, यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा, जळजळ किंवा त्वचेला सूज येण्याची शक्यता असते.
घरगुती उपायांमध्ये पपईचा वापर अतिशय उपयुक्त ठरतो. कच्च्या पपईमध्ये असलेल्या एंजाइम्समुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो, ज्यामुळे केसांची वाढ हळूहळू मंदावते.
पपईची पेस्ट चेहऱ्यावर लावून २०-२५ मिनिटे ठेवल्यानंतर, केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने हलक्या हाताने घासून ती काढू शकता.
हळद, बेसन, कोरफड किंवा दही यासारख्या घटकांबरोबर पपई मिसळून वापरल्यास त्वचेला पोषण मिळते, केसांची वाढ कमी होते आणि चेहरा अधिक स्वच्छ व मृदू वाटतो.
पपई व हळदीची पेस्ट केसांच्या वाढीला आळा घालते, तर पपई व बेसन त्वचेला टाईट आणि क्लीन बनवतात.
हे उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा नियमित केल्यास, काही आठवड्यांत नको असलेल्या केसांपासून सुटका मिळू शकते.