Akshata Chhatre
प्रसूतीनंतर केस गळणं सामान्य आहे, पण योग्य आहार आणि काळजी घेतल्यास त्याचा परिणाम कमी करता येतो.
भातात जीवनसत्त्वं आणि उर्जा असते. कोंडा निघाल्यावर संतुलित प्रमाणात भात खाणं केसांसाठी फायदेशीर आहे.
नारळातील चांगले फॅटी अॅसिड केसांना पोषण देतात. इडली, डोसा, उपमासोबत नारळ चटणी + तूप हे उत्तम संयोजन.
काळ्या तीळांमध्ये भरपूर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे केस मजबूत ठेवायला मदत करतात.
काजूमध्ये लोह आणि मॅग्नेशियम असते. ते खाल्ल्यास केस गळती कमी होऊ शकते. प्रत्येक स्त्रीची केस गळती वेगळी असते. पण योग्य आहार, थोडा संयम आणि नैसर्गिक उपचार हे सर्वोत्तम उपाय आहेत.