गोमन्तक डिजिटल टीम
भारताच्या ऐतिहासिक बंदरांपैकी गोव्याच्या बंदरांनी सागरी व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
गोपकपट्टण किंवा गोपकपटना हे पश्चिम किनारपट्टीवरील गोवा राज्यातील एक समृद्ध प्राचीन बंदर शहर होते.
प्राचीन गोव्यावर राज्य करणाऱ्या विविध हिंदू राजवंशांच्या राजवटीत गोपाकपट्टण राजधानी होते.
गोव्यातील चांदोर, गोपाकपट्टण आणि जुने गोवा ही बंदरे नदीकाठावर वसलेली होती आणि त्यांचा भारतातील बंदरांशी तसेच जगाच्या इतर भागांशी व्यापार संपर्क होता
विविध राजवंशांनी या बंदरातून पूर्व आशियाई आणि पश्चिम आफ्रिकन देशांशी व्यापार संबंध राखले
झुआरी नदीच्या काठावर वसलेले गोपाकपट्टण हे अरब व्यापाऱ्यांचे मुख्य प्रवेश ठिकाण होते
15 व्या शतकाच्या उत्तरार्धात गोव्याची राजधानी पुन्हा जुने गोवा येथे हलविण्यात आली.
वारंवार होणारी युद्धे तसेच इतर कारणे या बंदराच्या ऱ्हासास कारणीभूत ठरली.
एकेकाळचे गोव्याचे वैभव असणाऱ्या या जागी आता जुन्या बंदराचे काही अवशेष पाहायला मिळतात.