Sameer Amunekar
वादाच्या वेळी लगेच उत्तर देण्याऐवजी जोडीदाराचं म्हणणं पूर्ण ऐका. ऐकणं हेच अनेक वाद मिटवण्याचं पहिलं पाऊल असतं.
“तू नेहमी…” असे शब्द टाळा. त्याऐवजी “मला असं वाटतं…” असं सांगितल्यास समोरच्याला समजून घेणं सोपं जातं.
रागात किंवा थकलेल्या अवस्थेत चर्चा करू नका. दोघेही शांत असताना संवाद साधल्यास गैरसमज कमी होतात.
प्रत्येक वादात जुने मुद्दे काढल्याने समस्या वाढते. सध्याच्या विषयावरच बोला.
दिवसातून थोडा वेळ फक्त दोघांसाठी ठेवा. मोबाईलपासून दूर राहून संवाद साधल्यास जवळीक वाढते.
लहानसहान गोष्टींसाठीही धन्यवाद म्हणा. कौतुकाने नात्यात सकारात्मकता निर्माण होते.
वाद वाढतच असतील तर कुटुंबातील विश्वासू व्यक्ती किंवा समुपदेशकाची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका.