Sameer Amunekar
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. आवड-निवडी वेगळ्या असणं चुकीचं नाही, तर नातं समृद्ध करणारं असतं.
समोरच्याला स्वतःसारखं बनवण्याचा प्रयत्न न करता, तो/ती जसा आहे तसा स्वीकारणं म्हणजे खरी अंडरस्टँडिंग.
मनातलं न बोलता गृहीत धरू नका. शांतपणे बोलणं गैरसमज टाळतं
नात्यात अहंकारापेक्षा समजूतदारपणा जास्त गरजेचा असतो.
स्वतःच्या आवडी जोपासायला मोकळीक दिली तर नातं गुदमरल्यासारखं होत नाही.
“इतर जोडपी असं करतात” ही तुलना नात्यात दुरावा वाढवते.
समजून घेणं म्हणजे फक्त बोलणं नाही, तर कृतीतून साथ देणं.