Sameer Amunekar
पोहे हलके आणि कमी कॅलरीचे असतात. थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे ओव्हरईटिंग टळतं.
पोहे सहज पचतात. सकाळी जडपणा न आणता शरीराला ऊर्जा देतात, जे वजन कमी करताना खूप महत्त्वाचं आहे.
भाज्या, शेंगदाणे आणि थोडं लिंबू घातल्यास फायबर वाढतं. फायबरमुळे भूक नियंत्रणात राहते.
पोहे लो ग्लायसेमिक इंडेक्सचे असल्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही, त्यामुळे क्रेव्हिंग कमी होते.
फारसं तेल न वापरता बनवलेले पोहे आरोग्यदायी असतात. त्यात आयर्न, कार्बोहायड्रेट्स आणि आवश्यक मिनरल्स मिळतात.
पोहे शरीराला लगेच ऊर्जा देतात, त्यामुळे मेटाबॉलिझम अॅक्टिव्ह राहतो – वजन कमी करण्यासाठी फायदेशीर.
पोहेमध्ये स्प्राउट्स, भाज्या, उकडलेली वाटाणा किंवा टोफू घालून प्रोटीन वाढवता येतं – डाएट अधिक प्रभावी होतं.