Sameer Amunekar
गैरसमज टाळण्यासाठी रोज काही वेळ एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारा. संवाद हा प्रत्येक नात्याचा मजबूत पाया असतो.
कामाच्या धावपळीतही दररोज किंवा आठवड्यातून एकदा एकत्र दर्जेदार वेळ घालवा. यामुळे भावनिक जवळीक वाढते.
'धन्यवाद', 'तू छान दिसतेस/दिसतोस' किंवा एखादे छोटे सरप्राईज नात्यातील गोडवा कायम ठेवते.
मतभेद होणे स्वाभाविक आहे. मात्र राग मनात न ठेवता शांतपणे चर्चा करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
जोडीदाराच्या मतांचा, स्वप्नांचा आणि भावनांचा आदर केल्याने विश्वास अधिक दृढ होतो.
एकत्र असताना सतत फोनमध्ये गुंतून राहू नका. एकमेकांसोबत घालवलेला वेळ नातं अधिक मजबूत करतो.
'I Love You', मिठी, स्पर्श किंवा छोट्या कृतीतून नियमित प्रेम व्यक्त करा. यामुळे नात्यातील दुरावा कमी होऊन प्रेम पुन्हा फुलते.