Sameer Amunekar
गरम पाणी केसांमधील नैसर्गिक तेल कमी करते. त्यामुळे केस कोरडे, कमकुवत आणि तुटण्याची शक्यता वाढते. कोमट किंवा थंड पाण्याचा वापर करा.
ओले केस अधिक नाजूक असतात. अशावेळी रुंद दातांचा कंगवा वापरा आणि हळूहळू केस विंचरा.
वारंवार हेअर कलर, स्ट्रेटनिंग किंवा कठोर केमिकल असलेले शॅम्पू वापरल्याने केसांची गुणवत्ता खराब होऊ शकते.
आठवड्यातून 1-2 वेळा खोबरेल, बदाम किंवा आवळ्याचे तेल हलक्या हाताने लावल्यास टाळूला पोषण मिळते आणि केस मजबूत राहतात.
प्रथिने, लोह, बायोटिन, झिंक आणि व्हिटॅमिन A, C, D, E युक्त आहार केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असतो. पुरेसे पाणी पिणेही तितकेच गरजेचे आहे.
हेअर ड्रायर, स्ट्रेटनर किंवा कर्लरचा अतिवापर केल्यास केस कोरडे पडतात आणि तुटू लागतात. वापर करावाच लागल्यास हीट प्रोटेक्टंटचा वापर करा.
दुभंगलेली टोके कापल्याने केस अधिक निरोगी दिसतात. तसेच ताण कमी ठेवणे आणि 7-8 तासांची झोप घेणेही केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.