Sameer Amunekar
कोणत्याही नात्याचा पाया विश्वास असतो. एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि तो टिकवण्यासाठी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे.
केवळ प्रेम पुरेसं नाही; त्या प्रेमात परस्पर आदर असणं गरजेचं आहे. एकमेकांच्या मतांचा, भावना आणि निर्णयांचा सन्मान केला पाहिजे.
कोणतेही गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट आणि मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. आपल्या भावना आणि विचार शेअर करायला संकोच होता कामा नये.
प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या भावनांना आणि गरजांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. नात्यात सहनशीलता असणं गरजेचं आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात एकमेकांसोबत वेळ घालवणे खूप गरजेचे आहे. हे नाते अधिक मजबूत बनवते.
कोणत्याही नात्यात चुका होतात. त्या चुका स्वीकारून, माफ करून पुढे जाणे आवश्यक आहे. राग किंवा दुःख मनात बाळगल्याने नातं कमकुवत होतं.