फक्त करिअर नको, नात्यालाही द्या वेळ! रिलेशनशिपसाठी 2026 चे खास संकल्प

Akshata Chhatre

संकल्प

२०२६ मध्ये संकल्प करा की, पार्टनरशी बोलताना मोबाईल बाजूला ठेवून त्यांचं बोलणं नीट ऐकून घ्याल. संवादामुळे अनेक गैरसमज दूर होतात.

relationship goals for 2026 | Dainik Gomantak

कामाचा व्याप

कामाचा व्याप कितीही असला तरी, दिवसातील काही वेळ फक्त एकमेकांसाठी राखून ठेवा. आठवड्यातून एक दिवस कामाला सुटी देऊन जोडीदारासोबत घालवा.

relationship goals for 2026 | Dainik Gomantak

अपशब्द

वादाच्या वेळी अपशब्द वापरणे टाळा. रागात बोललेले शब्द मनावर खोल जखमा करतात. समस्येशी लढा, एकमेकांशी नाही, हा मंत्र लक्षात ठेवा.

relationship goals for 2026 | Dainik Gomantak

जोडीदाराची तुलना

आपल्या जोडीदाराची तुलना इतरांशी कधीच करू नका. त्यांच्या लहान प्रयत्नांचेही कौतुक करा. कदर केल्याने नात्यातील ओलावा टिकून राहतो.

relationship goals for 2026 | Dainik Gomantak

आवडीनिवडी

जोडीदाराच्या आवडीनिवडी आणि स्वप्नांचा आदर करा. त्यांना प्रगतीसाठी प्रोत्साहित करा. एकमेकांचे आधारस्तंभ बनणे हीच खऱ्या प्रेमाची ओळख आहे.

relationship goals for 2026 | Dainik Gomantak

कृतज्ञता

छोट्या छोट्या गोष्टींसाठी एकमेकांचे आभार मानण्यास शिका. कृतज्ञता व्यक्त केल्याने नात्यातील थकवा दूर होतो आणि उत्साह वाढतो.

relationship goals for 2026 | Dainik Gomantak

५ वचनं

१ जानेवारी २०२६ पासून हे ५ ही वचनं पाळून आपल्या नात्याला एका नव्या उंचीवर न्या. तुमचे प्रेम वर्षभर असेच बहरत राहो!

relationship goals for 2026 | Dainik Gomantak

अक्षय खन्नाची ती हेअरस्टाईल आहे विग; वयाच्या 19व्या वर्षीच का आला 'टक्कल'पणा?

आणखीन बघा