Akshata Chhatre
जर तुमच्यातील गप्पा फक्त 'हो-नाही' पुरत्या उरल्या असतील किंवा एकमेकांशी बोलताना तणाव जाणवत असेल, तर हा नातं बिघडल्याचा पहिला संकेत आहे.
एकाच घरात असूनही जर तुम्हाला मानसिकरित्या एकटं वाटत असेल आणि पार्टनरच्या भावनांमध्ये रस उरला नसेल, तर नात्यातील ओलावा संपला आहे.
एकमेकांच्या मतांचा किंवा पर्सनल स्पेसचा अनादर करणे, चारचौघात अपमान करणे किंवा सतत टीका करणे हे एका निरोगी नात्याचे लक्षण नाही.
जर तुम्ही भविष्यातील स्वप्ने पाहताना (करिअर, घर, प्रवास) जोडीदाराला त्यात गृहीत धरत नसाल, तर तुमची दिशा बदलली आहे हे स्पष्ट होते.
एका चांगल्या नात्यात जोडीदाराच्या यशाचा अभिमान वाटतो. पण जर तुम्हाला त्यांच्या प्रगतीचा मत्सर वाटत असेल, तर नात्यात कडवटपणा आला आहे.
हे संकेत दिसले म्हणजे नातं लगेच संपलं असं नाही. मोकळेपणाने संवाद साधून किंवा कपल थेरेपीच्या मदतीने नातं सावरता येऊ शकतं.
जर सर्व प्रयत्न करूनही काहीच बदलत नसेल, तर स्वतःच्या मानसिक शांततेसाठी आणि विकासासाठी सन्मानाने वेगळं होणं हाच उत्तम पर्याय ठरतो.