Sameer Amunekar
बिअरमधील अल्कोहोल यकृतासाठी अत्यंत घातक असतो. दीर्घकाळ बिअर प्यायल्यास फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस, व लिव्हर फेल्युअर होऊ शकतो.
सतत बिअर प्यायल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयाचा ठोका असमान होणे (arrhythmia) आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयाच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे ते कमकुवत होतात.
अल्कोहोल मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर्सवर परिणाम करतो.यामुळे स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय घेण्याची क्षमता बिघडणे, चिडचिडेपणा आणि डिप्रेशनसारख्या समस्या निर्माण होतात.
बिअरचे प्रमाण जास्त झाल्यास किडनीवर ताण येतो. डिहायड्रेशन होऊन किडनी स्टोन, फिल्ट्रेशन क्षमता कमी होणे यांसारखे धोके निर्माण होतात.
सतत बिअर पिणाऱ्यांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. यामुळे लिंगशक्ती कमी होणे, शीघ्रपतन किंवा नपुंसकता उद्भवू शकते.
बिअरमुळे अॅसिडिटी, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स, आणि अन्न पचवण्याची क्षमता कमी होऊ शकते. पॅनक्रियासवरही ताण येतो, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते.