Sameer Amunekar
वाईट विचारांपासून पळ काढू नका. त्यांना ओळखा आणि स्वतःला सांगा की, “हा एक विचार आहे, वस्तुस्थिती नव्हे.” स्वीकार केल्यावरच तुम्ही त्यावर काम करू शकता.
स्वतःला प्रश्न विचारा –"हा विचार कितपत खरा आहे?" "माझ्या आयुष्यात याचे परिणाम खरंच इतके वाईट होतील का?" विचारांची चिकित्सा केल्याने ते कमकुवत होतात.
प्रत्येक दिवशी ५-१० मिनिटांचे ध्यान किंवा श्वसन सराव (breathing exercise) करा. यामुळे मन शांत होते आणि विचारांचे नियंत्रण वाढते.
वाचन, व्यायाम, संगीत, निसर्गभ्रमण, योगा, किंवा तुमचे आवडते छंद — हे सर्व तुम्हाला मानसिक दृष्टिकोन बदलण्यास मदत करतात.
वाईट विचारांना मनात साठवू नका. विश्वासू मित्र, कुटुंबीय, किंवा मानसिक आरोग्यतज्ज्ञांशी बोला. किंवा ते विचार एका डायरीत लिहा — मन हलके होते.
जसेच वाईट विचार येतात, तसाच जाणूनबुजून सकारात्मक विचार करा. उदाहरण – वाईट विचार- मी अपयशी आहे. सकारात्मक विचार- माझ्याकडे अजून संधी आहेत, मी शिकतोय.