Sameer Amunekar
कामाचा ताण, मानसिक थकवा, झोपेची कमतरता, किंवा काही वैयक्तिक गोष्टी यामुळे सतत चिडचिड होऊ शकते.
नियमित व्यायाम केल्याने शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात आणि एंडोर्फिन्स (हॅपी हार्मोन्स) वाढतात, ज्यामुळे मन प्रसन्न आणि शांत राहते.
ध्यान (मेडिटेशन) केल्याने मन एकाग्र होते आणि तणाव कमी होतो.
पुरेशी झोप मिळाली नाही तर शरीर आणि मन दोन्ही थकतात, त्यामुळे चिडचिड, तणाव, आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो.
संतुलित आहार घेतल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात, त्यामुळे चिडचिड कमी होते. काही विशिष्ट आहार घटक मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत करतात.
वेळेचे योग्य नियोजन केल्यास गोंधळ आणि तणाव कमी होतो. सतत काम केल्याने मनावर ताण येतो आणि चिडचिड होते. त्यामुळं मधूनमधून विश्रांती घ्या.