Manish Jadhav
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या अनेक स्पर्धा खेळल्या जात आहेत, ज्यामध्ये वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफीचाही समावेश आहे.
वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धेत 18 वर्षांच्या मुलीने इतिहास रचला आहे. ही खेळाडू लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी फलंदाज ठरली आहे.
हा पराक्रम उत्तराखंड आणि नागालँड यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला. यापूर्वी हा विक्रम श्वेता सेहरावतच्या नावावर होता. श्वेता सेहरावतनेही या वर्षाच्या सुरुवातीला द्विशतक झळकावले होते. आता हे द्विशतक निलम भरद्वाजने ठोकले आहे.
उत्तराखंडची क्रिकेटर नीलम भारद्वाजने भारतीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला ठरली आहे.
नीलमने आपल्या अफलातून खेळीत 27 चौकार आणि 2 षटकार मारले. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना निलमने ही खेळी खेळली.