Redmi ने लॉन्च केला ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन; Vivo ला देणार टक्कर

Manish Jadhav

Redmi

Redmi ने नव्या वर्षातील (2025) पहिला स्मार्टफोन Redmi 14C लॉन्च केला आहे. हा फोन त्याच्या आधीच्या मॉडेल Redmi 13C अधिक शानदार आहे.

Redmi 14C | Dainik Gomantak

किंमत

या फोनची किंमत 9,999 रुपये एवढी आहे. Redmi 14C स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 2 चिपसेटसह सुसज्ज आहे. फोनमध्ये तुम्हाला अनेक दमदार फीचर्स मिळत आहेत.

Redmi 14C | Dainik Gomantak

कॅमेरा

फोटो-व्हिडिओसाठी 50 मेगापिक्सेल कॅमेराही देण्यात आला आहे.

Redmi 14C | Dainik Gomantak

Vivo ला टक्कर देणार

हा फोन आधीपासून मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या Vivo च्या Vivo T3x 5G स्मार्टफोनला टक्कर देणार आहे. विवोने आपल्या फोनची किंमतही 1000 रुपयांनी कमी केली आहे.

Redmi 14C | Dainik Gomantak

तीन व्हेरिएंट

Redmi 14C तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 9,999 रुपये आहे. त्याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह व्हॅनिला व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 10,999 रुपये आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज ऑप्शनसह व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे.

Redmi 14C | Dainik Gomantak

विक्री

या फोनची विक्री 10 जानेवारीपासून सुरु होणार आहे. तुम्ही तो कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon आणि Flipkart वरुन खरेदी करु शकता.

Redmi 14C | Dainik Gomantak

बॅटरी

Redmi 14C मध्ये तुम्हाला 5160mAh ची पॉवरफुल बॅटरी मिळत आहे. हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यासोबत तुम्हाला 33W चा चार्जर देखील मिळेल. ज्याद्वारे फोन जलद चार्ज करता येतो.

Redmi 14C | Dainik Gomantak
आणखी बघा