Sameer Amunekar
निवती बीचच्या पाण्याचा निळाशार रंग पाहून आपण एखाद्या परदेशी बेटावर आहोत की काय, असा भास होतो. इथली मऊ, स्वच्छ पांढरी वाळू या सौंदर्यात अधिकच भर घालते.
किनाऱ्याला लागूनच असलेली नारळाची आणि माडाची उंच झाडं कोकणच्या अस्सल निसर्गाची ओळख करून देतात. यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार आणि प्रसन्न दिसतो.
या किनाऱ्याजवळच ऐतिहासिक निवती किल्ला आहे. किल्ल्याच्या बुरुजावरून दिसणारा समुद्राचा 'पॅनोरॅमिक व्ह्यू' एखाद्या चित्रपटातील सीनसारखाच भव्य वाटतो.
समुद्रात असलेले उंच आणि सोनेरी रंगाचे खडक हे इथलं मुख्य आकर्षण आहे. सूर्यास्ताच्या वेळी या खडकांवर पडणारा प्रकाश एक विलक्षण अनुभव देतो.
निवतीच्या शांत आणि स्वच्छ पाण्यात अनेकदा डॉल्फिन्सचं दर्शन घडतं. इतर गर्दीच्या ठिकाणांपेक्षा इथे डॉल्फिन पाहण्याचा अनुभव अधिक शांत आणि जवळचा असतो.
डोंगरदऱ्या आणि समुद्र यांचा संगम असल्याने फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे नंदनवन आहे. इथले खडक आणि लाटांचे फोटो सोशल मीडियावर नक्कीच व्हायरल होतील असे येतात.
हे ठिकाण अजूनही 'अनएक्सप्लोर्ड' असल्याने इथे पर्यटकांची फारशी गर्दी नसते. ज्यांना गोंधळापासून दूर शांततेत वेळ घालवायचा आहे, त्यांच्यासाठी निवती हे सर्वोत्तम ठिकाण आहे.