Akshata Chhatre
रात्री उशिरापर्यंत जागणे आणि ७-८ तासांची झोप न घेणे यामुळे डोळ्यांतील रक्तवाहिन्या सुजतात आणि डोळे लाल दिसतात.
प्रदूषण, धूळ आणि धूर यामुळे डोळ्यांत खाज आणि जळजळ निर्माण होते. यामुळे डोळ्यांच्या बाहुल्यांवरही परिणाम होऊ शकतो.
सतत स्क्रीनसमोर बसणे किंवा हीटर/एसीच्या हवेमुळे डोळ्यांतील ओलावा कमी होतो, ज्यामुळे डोळे कोरडे पडून लाल होतात.
कॉन्टॅक्ट लेन्सची स्वच्छता न राखल्यास किंवा बॅक्टेरियामुळे 'कंजंक्टिवाइटिस' होऊ शकतो, जो वेगाने पसरणारा संसर्ग आहे.
डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी दिवसातून २-३ वेळा डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारा किंवा आईस पॅकचा वापर करा.
डोळे कोरडे वाटत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने 'आर्टिफिशियल टियर ड्रॉप्स' वापरा. यामुळे डोळ्यांतील ओलावा टिकून राहतो.
कामाच्या दरम्यान दर २० मिनिटांनी ब्रेक घ्या आणि डोळ्यांभोवती हलक्या हाताने मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारून आराम मिळतो.