गोमन्तक डिजिटल टीम
पावसाने या वर्षी गोवा राज्यात दमदार कामगिरी केलेली आहे.
मुसळधार कोसळणारा पाऊस राज्यात यंदा नवे नवे विक्रम करत आहे.
सत्तरीत अगदी कमी वेळात पावसाने द्विशतक पार केले आहे. हा नवा विक्रम नोंद झालेला आहे.
राज्यात एकूण ४०२२ मिमी म्हणजेच १५८.३५ इंच पावसाची नोंद झाली असून सरासरी तुलनेत ४७ टक्के अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सत्तरीनंतर सांगेची आता पावसाचे द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली असून सांगेत १९३.९९ इंच पाऊस पडला आहे.
राज्यात सर्वात कमी १२३ इंच पावसाची नोंद दाबोळीत झाली आहे.
दाबोळी, मुरगाव, मडगाव आणि पणजी वगळता इतर सर्व केंद्रावर १५० इंचाहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.