Ganesh Chaturthi 2024: हरित चतुर्थी म्हणजे काय? कशी साजरी करावी?

गोमन्तक डिजिटल टीम

गणेशोत्सव

गणेश चतुर्थी हा गोमंतकीयांचा सगळ्यात मोठा उत्सव असतो.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांनी राज्‍यात यंदापासून ‘हरित चतुर्थी’ साजरी करा असे आवाहन केले.

'प्लास्टर ऑफ पॅरिस’ नको

नागरिकांनी प्लास्टर ऑफ पॅरिस’च्‍या मूर्तींचा वापर टाळावा तसेच विक्रेत्यांनीही या मूर्तींची विक्री करु नये.

चिकणमातीला प्राधान्य

पर्यावरणपूरक चिकणमातीच्या मुर्त्यांची सर्वांनी पूजा करावी असेही सांगितले.

पारंपरिक माटोळी

चतुर्थीची माटोळीसुद्धा फळे-फुले आणून तयार करावी. प्लास्टिकच्या वस्तू अजिबात माटोळीला बांधू नयेत.

प्लास्टिक नकोच

सजावटीच्या साहित्यात मिळणाऱ्या प्लॅस्टिकच्या सर्वच वस्तू टाळाव्यात.

निर्माल्‍य फेकू नका

निर्माल्य नदी किंवा तलावात टाकू नये. ते झाडांच्या मुळांत घालावे, जेणेकरून झाडांना खत मिळेल.

Matoli
आणखी पाहा