Manish Jadhav
नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची अनेक कारणे असू शकतात. परस्परांचा आदर आणि एकमेकांसाठी असलेला वेळ हरवला की, सर्वात घट्ट नात्यातही नकळत दुरावा निर्माण होतो.
नात्यात जेव्हा संवाद कमी होतो, तेव्हा गैरसमज वाढू लागतात. मनातल्या गोष्टी मोकळेपणाने न बोलल्यामुळे जोडीदारांमध्ये मानसिक अंतर निर्माण होते.
विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. संशय घेणे किंवा एकमेकांपासून गोष्टी लपवणे यामुळे नात्यातील ओलावा संपतो आणि दुरावा वाढतो.
आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या व्यापापामुळे जोडीदाराला वेळ न देणे हे दुराव्याचे मोठे कारण ठरते. एकत्र वेळ न घालवल्याने भावनिक बंध कमकुवत होतात.
जोडीदाराची दुसऱ्या कोणाशी तरी तुलना करणे किंवा त्यांच्या चुकांवर सतत टीका करणे यामुळे समोरच्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो आणि ती व्यक्ती तुमच्यापासून दूर जाऊ लागते.
प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान असतो. नात्यात जेव्हा एकमेकांचा आदर केला जात नाही किंवा एकमेकांच्या मतांना महत्त्व दिले जात नाही, तेव्हा नात्यात कडवटपणा येतो.
भांडण झाले की जुन्या चुका पुन्हा पुन्हा काढल्याने वाद मिटण्याऐवजी वाढत जातात. भूतकाळातील गोष्टींमुळे वर्तमानातील सुखात अडथळा निर्माण होतो.
जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवणे आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे होणारा हिरमोड यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो.
एकत्र असतानाही मोबाईलमध्ये गुंतून राहणे यामुळे जोडीदाराला दुर्लक्षित वाटते. प्रत्यक्ष संवादापेक्षा व्हर्च्युअल जगाला महत्त्व दिल्याने प्रत्यक्ष नात्यात दुरावा येतो.