Sameer Amunekar
Realme ने भारतात एकाच वेळी त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Realme 14 Pro 5G आणि Realme 14 Pro+ 5G हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.
Realme 14 Pro 5G च्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनची किंमत 24,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.
या फोनचा टॉप व्हेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किमत 26,999 रुपये असणार आहे. या फोनची सेल 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यावर 2000 रुपयांची बँक सूट मिळेल.
Realme 14 Pro+ 5G हा फोन तीन व्हेरिएंटसह लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळेल, ज्याची किंमत 29,999 रुपये आहे. या फोनमध्ये 50MP मुख्य Sony IMX896 सेन्सर, 50MP Sony IMX882 पेरिस्कोप लेन्स आणि 8MP Sony IMX896 अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे.
8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 31,999 रुपयांना आणि फोनचा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येणार टॉप व्हेरिएंट 34,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे.
Realme 14 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.77 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Realme 14 Pro+ स्मार्टफोनमध्ये 6.83 इंच क्वाड कर्व OLED डिस्प्ले देण्यात आला आहे