Sameer Amunekar
अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असे फळ म्हणजे आवळा. दररोज एक आवळा खाल्ल्यास आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो.
आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करतात आणि हृदय निरोगी ठेवतात. तसंच आवळा रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतो. जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
आवळा चेहऱ्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात. मुरुमांची समस्या दूर करतं.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आवळा उत्तम आहे. विविध आजार आणि हंगामी संसर्गांपासून संरक्षण होते.
आवळ्याचा रस किंवा पावडर केस गळणे कमी करते आणि केसांना चमकदार बनवते. केसांची मुळं मजबूत करते आणि पांढऱ्या केसांची समस्या कमी करते.
वजन कमी करण्यासाठी आवळा फायदेशीर आहे. आवळ्यातील फायबरमुळे लवकर पोट भरल्यासारखं वाटतं. परिणामी तुम्ही अतिरिक्त कॅलरी सेवन करत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
आवळ्यात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे मानसिक ताण कमी करण्यास मदत करतात.