Sameer Panditrao
आजकाल ताण, चिंता, स्क्रीनटाईम यामुळे मूड स्विंग्स सामान्य झाले आहेत.
यावर साधासोपा उपाय आहे.
दिवसातून फक्त १० मिनिटे वाचनाने मन स्थिर होते, भावनांवर नियंत्रण वाढते आणि मूड स्थिर राहतो .
पुस्तकातील गोष्टींमध्ये हरवून जाणे ही थेरपीच असते. मेंदू नकारात्मक विचारांपासून दूर जातो.
मोबाईल-लॅपटॉपचा अति वापर मूड स्विंग्स वाढवतो. पुस्तक वाचणे स्क्रीनवरून ब्रेक देऊन मनाला विश्रांती देते.
रात्री झोपण्याआधी काही पाने वाचल्याने मन शांत होते आणि झोपेची गुणवत्ता वाढते. परिणामी दुसऱ्या दिवशी चिडचिड लक्षणीय कमी होते.
रोज वाचनामुळे मूड स्विंग्स कमी, आत्मविश्वास जास्त होतो. काही दिवसांनी फरक जाणवतोच!