Manish Jadhav
आयपीएल 2025 चा 58 वा सामना 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दरम्यान, या सामन्यात आरसीबीला एक विशेष कामगिरी करण्याची संधी असेल. गेल्या 10 वर्षांपासून आरसीबीला त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर कोलकाताला हरवता आलेले नाही. आरसीबीने 2015 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध या मैदानावर शेवटचा सामना जिंकला होता.
जर 17 मे रोजी होणाऱ्या सामन्यात आरसीबीने केकेआरला हरवले तर 10 वर्षांनंतर या मैदानावर कोलकाताविरुद्ध बंगळुरुचा हा पहिलाच विजय असेल.
आयपीएलमध्ये आरसीबी आणि केकेआर यांच्यात या मैदानावर एकूण 12 सामने खेळले गेले आहेत. यापैकी कोलकाता नाईट रायडर्सने 8 सामने तर आरसीबीने 4 सामने जिंकले.
आयपीएल 2025 चा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला गेला. आरसीबीने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.
पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 174 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात आरसीबीने 16.2 षटकांत 7 विकेट्स शिल्लक असताना लक्ष्य गाठले होते.
जर दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास, कोलकाता तिथेही वरचढ असल्याचे दिसते. आयपीएलमध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 35 सामने खेळले गेले, ज्यात केकेआरने 20 सामने जिंकले.