Sameer Amunekar
कच्च्या पपईतील एन्झाइम्स आणि फाइटोकेमिकल्स गर्भाशयाचे संकुचन वाढवतात, ज्यामुळे मासिक पाळी नियमित होण्यास मदत मिळते.
कच्ची पपई रक्तप्रवाह सुधारते आणि गर्भाशयाच्या स्नायूंना रिलॅक्स करते, त्यामुळे पाळीतील वेदना कमी होऊ शकतात.
त्यातील पपेन एन्झाइम पचन सुधारतो, फुगणे, अपचन आणि अॅसिडिटी कमी करण्यात मदत करतो.
कच्ची पपई कमी कॅलरीची, फायबरयुक्त असल्याने ती भूक नियंत्रित ठेवते आणि वजन कमी करण्यास सहाय्य करते.
त्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C त्वचेचा तेज वाढवतात, डाग-डार्क स्पॉट्स कमी करतात.
कच्ची पपई रक्तातील विषारी घटक काढून टाकते, ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि इन्फेक्शन कमी होतात.
व्हिटॅमिन A, C आणि बीटा-कॅरोटीनमुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते.