Sameer Panditrao
रवींद्र जडेजा २००९ पासून भारतीय संघासोबत संलग्न आहे.
बॅटिंग, बॉलिंग आणि उत्तम फिल्डिंग असल्याने तो लवकरच भारतीय संघाचा कायमस्वरूपी सदस्य बनला.
गिलच्या नेतृत्वाखाली दुसरा कसोटी सामना जिंकल्यावर जडेजाची कौतुक होते आहे.
जडेजा संघात आला तेंव्हा धोनी कॅप्टन होता.
त्यानंतर अनुक्रमे कोहली, रोहित कॅप्टन होते तेंव्हाही जडेजा अष्टपैलू खेळाने संघासाठी चांगला परफॉर्मन्स देत होता.
आता तरुण शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली जडेजाने चमकदार खेळीने इंग्लंडविरुद्ध विजयात आपला यशस्वी सहभाग नोंदवला आहे.
त्याच्या या सातत्यामुळे नेटकरी जडेजाचे खास कौतुक करत आहेत.