Manish Jadhav
रवींद्र जडेजाची गणना भारतातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते. त्याने अनेक कसोटी सामन्यांमध्ये एकट्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे.
आता इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत त्याने झहीर खानला मागे सोडले.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात एक विकेट घेताच जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत झहीर खानला मागे सोडले.
आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जडेजाच्या एकूण 611 विकेट्स झाल्या आहेत. झहीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 610 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेने भारताकडून सर्वाधिक 956 विकेट्स घेतल्या आहेत.
जडेजाने 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय कसोटी संघासाठी पदार्पण केले. त्यानंतर त्याने 83 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 3564 धावा केल्या. याशिवाय, त्याने 326 विकेट्स घेतल्या.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 231 विकेट्स आहेत.
तसेच, त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 54 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने भारतासाठी 2024 चा टी20 विश्वचषक आणि 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. टी20 विश्वचषक विजेतेपद जिंकल्यानंतर त्याने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.