Ravindra Jadeja: 'सर जडेजा'ची कमाल! कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास

Manish Jadhav

रवींद्र जडेजा

एकीकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा 20 जूनपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर होणाऱ्या संघावर खिळल्या असताना दुसरीकडे, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटीत एक नवा इतिहास रचला.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

मोठा पराक्रम

जडेजाने असा पराक्रम केला आहे जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी कोणताही खेळाडू करु शकला नाही.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

नंबर-1

जागतिक क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये गणला जाणरा सर जडेजा बऱ्याच काळापासून कसोटी अष्टपैलू क्रमवारीत नंबर-1 स्थानी विराजमान आहे.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

कसोटी ऑल-राउंडर खेळाडू

सध्या, जडेजा 400 रेटिंग गुणांसह आयसीसी कसोटी ऑल-राउंडर खेळाडू क्रमवारीत अव्वल स्थानी आहे, तर बांगलादेशचा खेळाडू मेहदी हसन मिराज 327 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

टॉप-10

ऑल-राउंडर खेळाडूंच्या क्रमवारीत, जडेजा सध्या टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय खेळाडू आहे, त्यानंतर अक्षर पटेल 220 रेटिंग गुणांसह 12व्या क्रमांकावर आहे.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

1151 दिवस अव्वल स्थानी कायम

जडेजाने 2022 मध्ये 9 मार्च रोजी जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी अष्टपैलू क्रमवारीत नंबर-1 स्थान मिळवले होते, त्यानंतर त्याने आतापर्यंत 1151 दिवस हे स्थान कायम ठेवले आहे.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak

कारकिर्द

जडेजाच्या आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 80 कसोटी सामन्यांमध्ये 34.74 च्या सरासरीने 3370 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने 24.14 च्या सरासरीने 323 विकेट्स घेतल्या आहेत.

Ravindra Jadeja | Dainik Gomantak
आणखी बघा