Manish Jadhav
भारताचा पहिला डाव केवळ 202 धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेच्या 489 धावांच्या तुलनेत भारतीय संघ 288 धावांनी पिछाडीवर पडला. आफ्रिकेकडून अष्टपैलू खेळाडू मार्को यानसेन याने धमाकेदार गोलंदाजी केली.
मार्कोने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. त्याच्या धारधार गोलंदाजीमुळे भारतीय संघावर या सामन्यात पराभवाचे मोठे सावट निर्माण झाले.
मार्कोने एकट्याने भारताच्या निम्मेपेक्षा जास्त फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याने 19.5 षटकांत 48 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या.
मार्को भारताच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा 10 वर्षांनंतरचा पहिला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ठरला. यापूर्वी, काइल एबॉटने 2015 मध्ये हा कारनामा केला होता.
मार्को हा भारतीय भूमीवर कसोटीत 5 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा जगातील फक्त चौथा डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला. यापूर्वी, ज्योफ डाइमॉक (1979) ने हा कारनामा केला होता.
पहिल्या डावात 489 धावा आणि भारताला 201 धावांवर बाद केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 314 धावांची मोठी आघाडी घेतली.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिका आधीच 1-0 ने आघाडीवर असून या सामन्यातही भारतावर पराभवाचे मोठे संकट निर्माण झाले. भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या डावात कमाल करावी लागणार आहे.